Devadhar classes is now entering in IIT coaching circle under the name of DAE (Devadhar's Academy Of Excellence)

Welcome to Devadhar Classes

प्रिय विद्यार्थी मित्र व पालकवर्ग

          आपल्या सर्वांचे देवधर क्लासेसच्या संकेतस्थळावर स्वागत. तेरा वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या साथीने सुरु केलेल्या प्रवासात एक नवीन वळण घेऊन आम्ही आपल्या सेवेसाठी हजर झालो आहोत. .विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असलेला पालक व क्लास मधील संवाद अधिक सुकर करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. वेब व मोबाईल तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणांचा फायदा घेऊन आम्ही एक नवीन सुविधा पालक व विद्यार्थ्यांसाठी सुरु करीत आहोत. विद्यार्थ्यांची माहिती, attendance, क्लासेसचे व परीक्षांचे वेळापत्रक, Home work, वेगवेगळ्या परीक्षेतील त्यांचे marks ( Relative and Individual) ही सर्व माहिती smartphone अथवा ह्या संकेतस्थळावर बघता येईल. मोबाईल application आपल्या smartphone वर download करावे. तेथे अथवा ह्या site वर आपणास दिलेल्या username आणि password ह्यांचा वापर करून उपलब्ध केलेली माहिती बघता येईल. नेहमीप्रमाणेच आपल्या सहकार्याची व पाठिंब्याची खात्री आहेच. आपल्या सहकार्याचा व अथक परिश्रमांचा परिपाक म्हणजे गेल्या तेरा वर्षात मिळवलेले नेत्रदीपक व दैदिप्यमान यश. क्लासच्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहता 12 वी बरोबरच CET च्या निकालांमध्ये पुणे विभागात "सर्वप्रथम", "महाराष्ट्रात दुसरा", "महाराष्ट्रात तिसरी" अशी लक्ष्यवेधक कामगिरी करून आपले नाव फक्त पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले आहे. आपण CET च्या Medical आणि Engineering च्या Entrance Exam मध्ये प्रस्थापित केलेला pattern 'पुणे Pattern ' असे सर्वदूर संबोधले जाणे ही एक अभिमानास्पदच बाब आहे . दरवर्षी Qualitative आणि Quantitative या दोन्हीही Areas मध्ये काहीतरी Innovative करण्याचा आपला प्रयत्न गेली ६ वर्ष सुरु असलेल्या 'Potential Batch' मुळे व त्या Batches नी दिलेल्या CET, JEEMains व आताशा NEET मधील result मुळे आणखीनच अधोरेखित झाला आहे. फक्त राज्य पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्ष्यांमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखविली आहे. या आणि अशा दरवर्षीच्या CET तील परिणामकारक निकालामुळे आपल्या क्लासेसची CET SPECIALIST अशी ओळख होऊ लागली आहे.
          या यशामध्ये गेली कित्येक वर्षे क्लासच्या प्रत्येक Activity मध्ये हिरीरीने आणि तळमळीने भाग घेणाऱ्या माझ्या सर्व सुपरिचित सहकारी शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे . त्याचबरोबर वर्षानुवर्षे वर्तमानपत्रातील जाहिरातींपेक्षाही आमच्यावरील दृढ विश्वासाने क्लासचे नाव पुण्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या दक्ष पालकवर्गाचाही मी ऋणी आहे आणि आपल्या क्लासच्या विद्यार्थ्याबाबत तर मी काय सांगू ? त्यांनी क्लासच्या शिक्षकांकडून मिळालेल्या Quality Guidance चा उपयोग करून स्वतःच्या मेहनतीने मिळवलेले यश हेच क्लासचे यश आहे ! प्रगतीच्या नवनवीन टप्प्यांमध्ये लक्ष्मी रोड नंतर स्थापन झालेल्या सातारा रोड व पौड रोड येथील नवीन शाखाही अतिशय यशस्वी झालेल्या आहेत. साताऱ्यातील CET Coaching नंतर इस्लामपूरमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर Weekly CET Coaching प्रमाणित करून पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या क्लासच्या यशामध्ये सामील करून घेण्याच्या प्रयोगाला मूर्त स्वरूप आलेले आहे. सर्वात शेवटी मी त्या गुणग्राहक, आमच्या मेहनतीचे चीज करणाऱ्या, आमच्यावर यशाची पखरण करणाऱ्या आणि सर्व समस्यांमधून आमची अलगदपणे सोडवणूक करणाऱ्या नियन्त्यासमोर नतमस्तक होवून एकाच प्रार्थना करू इच्छितो -

"सदोदित तुझी आम्हां आठवण राहू दे रे
प्रत्येक कर्मात आमुच्या ती प्रतीत होऊ दे रे !"


Notice Board


All | XI Class |XII Class |XII_19-20 Class |XI_19-20 Class |


Scan QR code to download SmartBridge For Classes Android App, or click here to open download link

Our Students